22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeऔरंगाबादस्पर्धा परीक्षांसाठी मराठीचे धोरण ठरवा

स्पर्धा परीक्षांसाठी मराठीचे धोरण ठरवा

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद खंडपीठाचे राज्य सरकारला निर्देश
औरंगाबाद : स्पर्धा परीक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यापुढील स्पर्धा परीक्षासंदर्भात मराठीचे धोरण ठरवा, असे औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा राज्यातील स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना होणार आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी म्हटला की, आपल्या डोळ््यासमोर खडखड इंग्रजी बोलणा-या विद्यार्थ्यांचे चित्र उभे राहते, तर अधिकारी व्हायचे म्हटल्यावर इंग्रजीवर जोर हवा, असेही अनेकांना वाटते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे पाठ फिरवतात. मात्र, याच विद्यार्थ्यांची इंग्रजीची भीती आता दूर होणार आहे. कारण भाषा संचालनालयाच्या माध्यमातून यापुढील काळात प्रत्येक परीक्षा मराठीतूनच घेण्याविषयीचे धोरण राज्य शासनाने ठरवावे, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. तर या अनुषंगाने पुढील तारखेपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

न्यायालयात झालेल्या रीट याचिकेत कृषी विभागातील तांत्रिक नोक-यांसाठीच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणा-या पूर्व परीक्षेला भाषेचे माध्यम विचारणारा पर्याय दिलेला होता. मात्र, मुख्य परीक्षेला भाषेच्या संदर्भाने पर्याय विचारण्यात आलेला नव्हता. परीक्षा इंग्रजीत आणि अभ्यासक्रम शिकला मराठीत या मुद्याच्या आधारे याचिकाकर्त्याने परीक्षाही मराठीत घेण्यासाठी राज्य शासनाला निर्देश द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका खंडपीठात दाखल केली होती. त्यावरच न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. या निर्णयाचे विद्यार्थ्यांनीही स्वागत केले आहे.

मराठी भाषेत परीक्षा घेऊन न्याय द्या
भाषा संचालनालयाच्या माध्यमातून या परीक्षा मराठी माध्यमातून कशा होतील, याची माहिती द्यावी, प्रत्येक परीक्षा यापुढे मराठीत कशा घेता येतील, याचा पर्याय देऊन मराठी भाषिकांना कसा न्याय मिळेल, याची माहिती द्यावी.

जनहित याचिकेत रूपांतर करणार
सोबतच आदेश देताना याचिकाकर्त्याची याचिका जनहित याचिकेत रुपांतरित करण्याचा निर्णय पुढील ३ ऑक्टोबर रोजी येणा-या सुनावणीवेळी घेतला जाईल, असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे टेन्शन मात्र दूर होणार असेच म्हणता येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या