नरेंद्र मोदींवर थेट आरोप : गरीब कामगार जे पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतात ते कधी सुरु करणार?
पुणे, 31 मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 1 जून ते 30 जूनदरम्यान लॉकडाऊन 5 असेल. मात्र, या लॉकडाऊनमध्ये श्रीमंतांसाठी निर्णय घेण्यात आले. मात्र, गरीबांना वाऱ्यावर सोडण्यात आलं आहे. त्यामुळे हे सरकार श्रीमंतांचे आहे, असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
पाचवा लॉकडाऊन करताना काही नियम, अटी घालण्यात आल्या तर काही ठिकाणी नियमांना धरून लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याचे सांगण्यात आलं. त्यात मॉल, हॉटेल तसेच काही कार्यालये उघडण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, गरीब कामगार जे पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतात ते कधी सुरु करणार, याबाबत काहीच खुलासा करण्यात आला नाही, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी केला.
Read More वृत्तपत्र विक्रेत्याने सापडलेले 50 हजारांचे सोने केले परत
शिवाय कार्यालये चालू करणार पण गरीब कामगार प्रवास कसा करतील, याबाबत केंद्र आणि राज्य सरकार बोलायला तयार नाही. कोरोनाच्या काळातही हे सरकार श्रीमंतांची बाजू घेत आहे आणि गरिबांना वाऱ्यावर सोडत आहे, असे चित्र पाचव्या लॉकडाऊनमध्ये दिसत आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचा जाहीर मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.