24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयकोरोना शुल्क हटवण्याचा निर्णय : दिल्लीत आता दारू स्वस्त होणार

कोरोना शुल्क हटवण्याचा निर्णय : दिल्लीत आता दारू स्वस्त होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली, 7 जून: मद्यप्रेमीसाठी खूशखबर आहे, ती म्हणजे दिल्लीत आता दारू स्वस्त होणार आहे. दिल्लीतील केजरी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दारूवर लावण्यात आलेलं कोरोना शुल्क हटवण्याचा निर्णय केजरीवाल सरकारनं घेतला आहे. काही दिवसांपूर्वी सरकारनं दारूवर अतिरिक्त 70 टक्के कोरोना महामारी कर लादला होता. आता येत्या 10 जूनपासून हे शुल्क रद्द करण्यात येणार आहे. परिणामी दारूचे दर कमी होणार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाऊन लागू केला होता. मात्र, कोरोनाचा कहर सुरूच असल्यानं केंद्र सरकारनं लॉकडाऊन वाढवला आहे. सध्या देशात पाचवा लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, केंद्र सरकारनं लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारूची दुकाने सशर्त उघडण्यास परवानगी दिली होती. सोशल डिस्टंसिंगचं पालन करण्यास सांगण्यात आलं होतं मात्र, तळीरामांनी एकच गोंधळ केला होता. लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवून सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा उडवला होता.

Read More  बजाज हे कोरोना किंवा मेडिकल एक्स्पर्ट नाहीत : देवेंद्र फडणवीस

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या