19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयभारताला हिंदू राष्ट्र घोषित करा

भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा

एकमत ऑनलाईन

अयोध्या : अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी दि. १२ ऑक्टोबर रोजी आमरण उपोषणास सुरूवात करणार असल्याची घोषणा केली आहे. दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजेपासून उपोषणास सुरूवात करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या अगोदर त्यांनी राम जन्मभूमीसाठी अनेक दिवस आमरण उपोषण केलं होतं व त्यानंतर ते चर्चेत आले होते. या उपोषणाद्वारे ते भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी व मुस्लिमांचे नागरिकत्व समाप्त करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करतील. याचबरोबर परमहंस दास यांनी बांग्लादेश आणि पाकिस्तान राहत असलेल्या हिंदूंना भारतात आणण्याची व भारतातील मुस्लिमांना पाकिस्तान व बांग्लादेशात पाठवण्याची देखील मागणी केली आहे.

या अगोदर देखील महंत परमहंस दास यांनी राम जन्मभूमीसाठी अनेक दिवस आमरण उपोषण केले होते व त्यानंतर ते चर्चेत आले होते. आपल्या विविध कृतींमुळे महंत परमहंस दास सातत्याने चर्चेत राहतात.

शारदीय नवरात्र महोत्सवात भाविकांना घरबसल्या होणार दर्शन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या