Sunday, September 24, 2023

राज्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

मुंबई : राज्यात धुमाकूळ घालणारे कोरोनाचे संकट हळूहळू नियंत्रणात येत असून कोरोनामुक्त झालेल्या राज्यातील रुग्णांची संख्या २ लाख ९९ हजार ३५६ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल १२ हजार ३२६ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, दुसरीकडे ७७६० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना कोरोनाचा प्रादूर्भावही नियंत्रणात येत आहे. दहा हजारापुढे गेलेला रुग्णवाढीचा आकडा आता ७ हजारांच्या घरात आला आहे, तर दुसरीकडे कोरोनावर मात करून घरी परतणा-या रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. गेल्या २४ तासात १२ हजार ३२६ लोक कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.३७ टक्के झाले आहे.

आज ७ हजार ७६० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४२ हजार १५१ रुग्णांवर (अ‍ॅक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यात आजपर्यंत सुमारे २३ लाख ५२ हजार संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या नमुन्यांपैकी ४ लाख ५८ हजार नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज ३०० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची एकूण संख्या १६ हजार १४२ झाली आहे.

देशाची रुग्णसंख्या १८.५ लाखांवर
ळदेशात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशात ५२ हजार ०५० रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८ लाख ५५ हजार ७४६ वर पोहोचली आहे. यापैकी १२ लाख ३० हजार ५१० जणांनी कोरोनावर मात केली. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसाला ५० हजारांपेक्षा अधिक वाढ होताना दिसत आहे. यासोबतच गेल्या २४ तासांमध्ये देशात ८०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचा आकडा ३८ हजार ९३८ इतका झाला आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या