18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeराष्ट्रीयकोरोना रुग्णसंख्येत घट

कोरोना रुग्णसंख्येत घट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात काही दिवसांपासून कोरोनाच्या तिस-या लाटे संदर्भात अंदाज वर्तवला जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत घट निर्माण होत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत ३० हजार २५६ नवे रुग्ण आढळून आले असून, २९५ जणांच्या मृत्यूची नोंदणी करण्यात आली.

नवीन रुग्णांसह देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ३४ लाख ८ हजार ४१९ झाली. त्यापैकी ३ कोटी २७ लाख १५ हजार १०५ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. कोरोनाने एकूण ४ लाख ४५ हजार १३३ जणांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे. मागील २४ तासांत ४३ हजार ९३८ रुग्ण बरे झाले आहेत. देशात ३ लाख १८ हजार १८१ सक्रिय रुग्ण उपचारधीन आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत ३७ लाख ७८ हजार २९६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण मोहीमेअंतगर्त आतपर्यंत ८० कोटी ८५ लाख ६८ हजार १४४ जणांचे लसीकरण झाले.

केरळातील रुग्णसंख्येत वाढ कायम
देशात गेल्या २४ तासांत आढळून आलेल्या ३० हजार २५६ रुग्णांपैकी तब्बल १९ हजार ६५३ रुग्ण एकट्या केरळ राज्यातील आहेत. तर २९५ मृतांपैकी १५२ मृत्यू हे केरळमध्ये झाले आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या