37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeपरभणीसमर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित

समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित

एकमत ऑनलाईन

परभणी : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजे एन टी) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग घटित करून त्यांच्या भेटीचा कार्यक्रम घोषित केला आहे.

समर्पित आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणा-या विविध सामाजिक संघटना यांची निवेदन स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. या संबंधित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदने देता यावीत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांक पूर्वी करावी. यासाठी आपल्या संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा असे आयोगामार्फत निवेदन करण्यात आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या