19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयजगातील सर्वांत मोठ्या बोगद्याचे लोकार्पण

जगातील सर्वांत मोठ्या बोगद्याचे लोकार्पण

एकमत ऑनलाईन

रोहतांग : हिमाचल प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या ९.०२ कि.मी. लांबीच्या अटल टनल रोहतांग या बोगद्याचे शनिवार दि. ३ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या बोगद्यामुळे गेल्या दहा वर्षांपासूनची भारतीयांची प्रतीक्षा आता संपली आहे. अटल बोगदा ८० किलोमीटर प्रतितास वेगाने दररोज ३ हजार गाड्या, १ हजार ५०० ट्रकच्या वाहतुकीसाठी डिझाईन करण्यात आला आहे.

 

या बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या युद्धनीती विषयक धोरणाचा हा महत्वाचा भाग ठरणार आहे. हा जगातील सर्वात मोठा बोगदा असून, भारतीय लष्कराला त्यामुळे पाकिस्तान आणि चीन सीमेपर्यंत सहज प्रवेश करता येणार आहे. पीरपंजाल डोंगररांगांना भेदून ३,३०० कोटी रुपये खर्चून हा बोगदा बनवण्यात आला आहे. हा बोगदा जगातील सर्वाधिक उंचीवर (१०,०४० फूट) बनवण्यात आला आहे. या बोगद्यामुळे लाहौल येथील जनता आता थंडीच्या दिवसात हिमवृष्टी सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत जगापासून संपर्काविना राहणार नाही.

विशेष म्हणजे चीनला लागून असलेल्या लडाख आणि पाकिस्तानला लागून असलेल्या कारगिलपर्यंत भारतीय सैन्याला सहज पोहोचता येणार आहे. भारतीय लष्कराला रसद पुरविण्याचे कामदेखील सोपे होणार आहे. तसेच चीनकडील सीमेवर कोणत्याही ऋतूमध्ये पोहोचता येणार आहे. यातून मनाली आणि लेहदरम्यानचे अंतर ४६ किमीने कमी होणार असल्याने मनाली ते केलांगचे अंतर केवळ दीड तासात पार करता येणार आहे. यातून या भागात पर्यटनालाही गती मिळणार आहे. याशिवाय लेह-लडाखमधील शेतकरी, मजूर आणि युवकांना आता राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. विशेष म्हणजे अटल टनेल हे लेह, लडाखची लाइफलाइन बनेल, असे पंतप्रधान म्हणाले.

इंदिरा गांधी यांचे स्वप्न पूर्ण
१९७२ मध्ये माजी आमदार लता ठाकूर यांनी ६ महिने बर्फात अडकून पडण्याच्या समस्येबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या ठिकाणी बोगदा निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते.

सोनिया गांधींनी केले होते भूमिपूजन
सन २००० मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी आपले मित्र टशी दावा ऊर्फ अर्जुन गोपाल यांच्या निमंत्रणावरुन केलांग येथे जाऊन रोहतांग बोगद्याच्या उभारणीची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर २८ जून २०१० मध्ये सोनिया गांधी यांच्या हस्ते या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. त्यावेळी बोगद्यासाठी १,३५५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती.

अटल टनेल सीमासंपर्काचे जिवंत उदाहरण
अटल टनेल भारताच्या सीमेवरील पायाभूत सुविधांना नवी शक्ती प्रदान करणारा ठरणार आहे. अटल टनेल हा जागतिक पातळीवरील सीमासंपर्काचे एक जीवंत उदाहरण आहे. यासाठी गेल्या सहा वर्षांच्या काळात जुनी परिस्थिती बदलण्याच्या दिशेने अभूतपूर्ण प्रयत्न केले आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.
बोगद्यात अशा असतील या सुविधा

या बोगद्यात प्रत्येक १५० मीटर अंतरावर टेलिफोनची सुविधा असेल. ६० मीटरवर फायर हायड्रेट, ५०० मीटरवर आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा मार्ग, प्रत्येक १ किमीवर हवेची गुणवत्ता तपासली जाणार आहे. याबरोबरच २५० मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमॅ-याच्या मदतीने घटनांची माहिती मिळवणारी यंत्रणाही देण्यात आली आहे. यामध्ये सेमी ट्रान्सवर्स व्हेंटिलेशन सिस्टम, एससीएडीए नियंत्रण अग्निशमन, अत्याधुनिक इलेक्ट्रो-मेकॅनिकल प्रणालीही देण्यात आली आहे.

‘फार्म मेड’ची ऑनलाईन फळविक्री

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या