24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयवॉशिंग्टन डीसीमधील भारतीय दुतावासाबाहेर महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

वॉशिंग्टन डीसीमधील भारतीय दुतावासाबाहेर महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

एकमत ऑनलाईन

​जॉर्ज फ्लॉयड कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान अमेरिकेतील महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली. गांधीजींचा हा पुतळा वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर आहे. युनायटेड स्टेटस पार्क  पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

सेंट लुइस शहरामध्ये आंदोलनादरम्यान काही नागरिक दुकांनाची तोडफोड करुन लूटमार करत आहेत. असाच एक चोरीचा प्रयत्न थोपवताना सेंट लुइसचे निवृत्त पोलिस कॅप्टन मारले गेले. जॉर्ज फ्लॉयड या व्यक्तीच्या मृत्यू निषेधार्थ होणाऱ्या आंदोलनातील पोलिसांची ही पाचवी हत्या आहे.

Read More  अमेरिकेत परिस्थिति हाताबाहेर, डोनाल्ड ट्रम्प यांना बंकरमधे लपवल

मिनियापोलिस शहरामध्ये जॉर्ज फ्लॉयड नामक कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण जगभरात हिंसक आणि शांततापूर्वक आंदोलने सुरु आहेत.  26 मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर अमेरिकेत हिंसाचाराचा भडका उडाला आहे. वॉशिंग्टन, डल्लास, ह्युस्टन, अटलांटा, कॅलिफोर्निया आदी १४० शहरांमध्ये दंगलखोरांनी उत्पात माजवला आहे. अनेक ठिकाणी पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली. बऱ्याच ठिकाणी जमावाच्या रोषाला पोलीस बळी पडले. यात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाले आहेत. सोमवारी व्हाईट हाऊससमोर आंदोलन करणारे आंदोलक अत्यंत आक्रमक झाल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या