23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeआंतरराष्ट्रीयसुनक यांचा पराभव, ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान

सुनक यांचा पराभव, ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान

एकमत ऑनलाईन

लंडन : ब्रिटनच्या परराष्ट्र सचिव लिझ ट्रस या ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान बनल्या आहेत. त्यांनी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचा पराभव केला. आता त्या लवकरच पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. या अगोदर बोरिस जॉन्सन यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी ही निवडणूक झाली.

सरकारी शाळेत शिकलेल्या ४७ वर्षीय ट्रस यांचे वडील गणिताचे प्राध्यापक आणि आई नर्स होती. कामगार समर्थक कुटुंबातून आलेल्या ट्रस यांनी ऑक्सफर्डमधून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास केला.शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ अकाउंटंट म्हणूनही काम केले. त्यानंतर त्या राजकारणात आल्या. सुरुवातीला नगरसेवक म्हणून त्यांनी पहिली निवडणूक जिंकली. ट्रस यांना उजव्या विचारसरणीच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाते. ट्रस २०१० मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. ब्रिटिश मीडियात ट्रस यांची तुलना माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्याशी केली जाते.

लिझ ट्रस यांचे पूर्ण नाव मेरी एलिझाबेथ ट्रस असे आहे. त्यांचा जन्म २६ जुलै १९७५ रोजी ऑक्सफर्ड इंग्लंड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जॉन केनेथ तर, आईचे नाव प्रिसिला मेरी ट्रस असे होते. ट्रस यांचे वडील लीड्स विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते, तर आई परिचारिका होती. ट्रस चार वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंब स्कॉटलंडला स्थायिक झाले. येथे त्यांनी सुरुवातीचे शिक्षणाचे धडे घेतले. त्यानंतर काही वर्षांनी त्या कॅनडाला शिफ्ट झाल्या. १९९६ मध्ये ट्रस यांनी ऑक्सफर्डच्या मर्टन कॉलेजमधून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयांमधील शिक्षण पूर्ण केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या