29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeराष्ट्रीयलस प्रमाणपत्रावरून मोदींचा फोटो हटवा; निवडणूक आयोगाचे निर्देश

लस प्रमाणपत्रावरून मोदींचा फोटो हटवा; निवडणूक आयोगाचे निर्देश

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर सर्व पक्षीयांच्या प्रचाराला आता आणखी वेग आला आहे. दुसरीकडे कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींना देण्यात येणा-या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. विरोधकांकडून या गोष्टीवर आक्षेप नोंदवला आला आहे. याची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला निर्देश देत पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा, असे सांगितले आहे.

पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुदुच्चेरीमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम अलीकडेच जाहीर करण्यात आला आहे. पाचही राज्यांतील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एकत्र २ मे रोजी मतमोजणी होईल. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला काही निर्देश दिले आहेत.

पंतप्रधान मोदींचा फोटो नको
कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, कोरोना लस घेणा-यांना दिल्या जाणा-या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत, तेथील कोरोना लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. केंद्र सरकार आचार संहितेचे उल्लंघन करत आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला होता. मात्र, तो आरोप निवडणूक आयोगाकडून फेटाळण्यात आला आहे.

शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा राकेश टिकैत यांचा निर्धार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या