31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभारताचा चुकीचा नकाशा हटवा

भारताचा चुकीचा नकाशा हटवा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आपल्या मंचावरून जम्मू काश्मीरचा चुकीचा नकाशा हटवण्याचे आदेश ‘विकिपीडिया’ला भारत सरकारकडून देण्यात आले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६९ ए नुसार विकिपीडियाला जम्मू काश्मीरचा चुकीचा नकाशा दर्शवणारी लिंक हटवण्याचे आदेश दिले आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने विकिपीडियाने केलेला खोडसाळपणा उघडकीस आणला होता. ‘विकिपीडिया’ने भारत – भूतान संबंधांशी निगडीत लिंकवर जम्मू काश्मीरचा चुकीचा नकाशा दर्शवल्याचे या युझरने लक्षात आणून दिल्यानंतर अनेकांचे लक्ष याकडे गेले होते. भारतीय नागरिकांकडून यासंदर्भात कारवाई करण्याचा आग्रह सरकारकडे केला होता.

विकिपीडियाच्या या प्रकरणाची नोंद घेत मंत्रालयाने २७ नोव्हेंबर २०२० रोजी आदेश जारी करत विकिपीडियाला चुकीचा नकाशा हटवण्याचे आदेश जारी केले. यामुळे, भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन होत असल्याचे केंद्रसरकाने आदेशात म्हटल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

कायदेशीर कारवाई करण्याची तंबी
विकिपीडियाने नकाशात बदल केला नाही तर अशा वेळी कंपनीविरोधात कायदेशाीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही सरकारकडून देण्यात आली आहे. कारवाईनुसार विकिपीडियाचा संपूर्ण मंच ब्लॉक करण्याचाही विचार केला जाऊ शकतो.

शेतकरी आंदोलनाला परदेशातील खासदारांचा पाठिंबा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या