37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeक्रीडादिल्ली अन हैदराबादचे प्ले आँफ खडतर

दिल्ली अन हैदराबादचे प्ले आँफ खडतर

एकमत ऑनलाईन

रविवारी झालेल्या दोन्ही सामन्यात टारगेट चेस करणारे संघ आपले आव्हान पेलू शकले नाहीत त्यामुळे दिल्ली आणि हैदराबादचा प्ले ऑफमधील प्रवेश खडतर झाला आहे. उभय संघांनी अकरा सामन्यांत पाच विजय मिळविल्याने दोघांचे दहा गुण झाले आहेत. आता या पराभवामुळे त्यांना पुढील ३ सामने जिंकत प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे आणि राजस्थान व बंगळुरू संघांच्या पराभव होण्याची वाट पाहावी लागेल तसेच हैदराबाद विरुद्ध बंगळुरू यांच्यात रविवारी दुपारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२२ मधील ५४ वा सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने ३ बाद १९२ धावा केल्या.

हा सामना आरसीबीने तब्बल ६७ धावांनी जिंकला. आधी फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीत आरसीबीच्या खेळाडूंनी जबरदस्त प्रदर्शन केले. बंगळूरूकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने मोठी खेळी केली. याउलट त्याचा सलामी जोडीदार विराट कोहली मात्र गोल्डन डक झाला. यानंतर एक अनोखा विक्रम झाला आहे. बंगळूरूची सलामी जोडी जास्त वेळ टिकू शकली नाही. डावातील पहिल्याच चेंडूवर हैदराबादचा गोलंदाज जगदीश सुचीथ याने केन विलियम्सनच्या हातून विराटला झेलबाद केले. परिणामी विराट एकही धाव न करता पव्हेलियनला परतला. मात्र विराट बाद झाल्यानंतरही डू प्लेसिसने एक बाजू धरून ठेवली.

त्याने रजत पाटीदारसोबत १०५ धावांची प्रशंसनीय भागीदारी रचली. पाटीदार १३ व्या षटकातील दुस-या चेंडूवर ४८ धावा करून बाद झाला. त्यानंतर त्याच्यात आणि ग्लेन मॅक्सवेलमध्ये ५४ धावांची भागीदारी झाली. तसेच शेवटी दिनेश कार्तिकसोबत ३३ धावांची अभेद्य भागीदारी केली. अशाप्रकारे सलामीला फलंदाजीला येत डू प्लेसिसने शेवटपर्यंत फलंदाजी करत संघाचा डाव पुढे नेला. या दरम्यान डू प्लेसिसने५० चेंडूत २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने नाबाद ७३ धावा फटकावत कर्णधाराची खेळी केली. आयपीएलमध्ये एक सलामी जोडीदार शून्य धावेवर बाद झाल्यानंतर दुस-या सलामीवीराने अर्धशतक करण्याची ही दुसरीच वेळ होती.

तब्बल १३ वर्षांपूर्वी २००९ साली डेक्कन चार्जर्सकडून अ‍ॅडम गिलख्रिस्टने आपला सलामी जोडीदार शून्यावर बाद झाल्यानंतर दिल्ली डेअरडेविल्सविरुद्ध ८५ धावा केल्या होत्या दरम्यान बंगळूरूच्या डावाबद्दल बोलायचे झाल्यास, विराट वगळता बंगळूरूकडून सर्वांनी चांगल्या खेळी केल्या. डू प्लेसिसने नाबाद ७३ धावांचे योगदान दिले. पाटीदारनेही ३८ चेंडूंमध्ये ४८ धावा फटकावल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेलनेही ३३ धावा केल्या. डावाअंती दिनेश कार्तिकनेही ८ चेंडूंमध्ये ३० धावा जोडल्या.

या दरम्यान त्यांचा फिरकी गोलंदाज वनिंदू हसरंगाने संघासाठी आयपीएलच्या इतिहासातील दुसरे सर्वोत्तम प्रदर्शन करून दाखवले श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वनिंदू हसरंगा या सामन्यात ४ षटकांत १८ धावांत ५ विकेट्स नावावर केल्या. आरसीबीच्या इतिहासातील ही एखाद्या गोलंदाजाने केलेली दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. माजी दिग्गज अनिल कुंबळेने आयपीएल २००९ मध्ये आरसाबीसाठी सर्वोत्तम कामगिरी केली होती. कुंबळेने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ५ धावा खर्च करून पाच विकेट्स घेतल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघ अवघ्या १२५ धावा करून सर्वबाद झाला. हैदराबादकडून फलंदाजी करताना फक्त राहुल त्रिपाठीने ३७ चेंडूत ५८ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त एडेन मार्करमने २१ आणि निकोलस पूरनने १९ धावांचे योगदान दिले होते. कर्णधार केन विलियम्सनदेखील शून्य धावसंख्येवर धावबाद होऊन तंबूत परतला. या विजयानंतर आरसीबी १२ गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे.

आयपीएल २०२२ मधील ५५ वा सामना चेन्नई सुपर दिल्ली संघात खेळण्यात आला. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात चेन्नईने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये २ बदल केले होते. मागील सामन्यात बंगळूरूविरुद्ध खेळणारा रवींद्र जडेजा आणि ड्वेन प्रिटोरिअस यांना या सामन्यात संघातून बाहेर केले. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

या वेळी पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने ६ बाद गमावत दिल्लीपुढे २०८ धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघ १७.४ षटकांत सर्व विकेट्स गमावत फक्त ११७ धावाच करू शकला. त्यामुळे चेन्नईने हा सामना ९१ धावांनी जिंकला. दिल्लीने या हंगामात संमिश्र कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये ५ विजय मिळवले आहेत, या पराभवामुळे ते ९० हून अधिक धावांनी पराभूत होणा-या संघाच्या यादीत सामील झाले आहेत. चेन्नईविरुद्ध ९१ धावांनी पराभूत झाल्यामुळे दिल्ली संघ

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ९०हून अधिक धावांनी पराभूत होणारा संयुक्त रीत्या अव्वल संघ ठरला. तब्बल पाचव्यांदा दिल्लीला या विक्रमाचा सामना करावा लागला. दिल्लीसोबत संयुक्त रीत्या अव्वलस्थानी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघ आहे. बंगळूरूही यापूर्वी ५ वेळा ९० हून अधिक धावांनी पराभूत झाला आहे. यानंतर संयुक्त रीत्या दुस-यास्थानी कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स हे संघ आहेत. हे दोन्ही संघ यापूर्वी २ वेळा ९० हून अधिक धावांनी पराभूत झाले आहेत.

डॉ. राजेंद्र भस्मे

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या