25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडादिल्लीची केकेआरवर मात

दिल्लीची केकेआरवर मात

एकमत ऑनलाईन

मुंबई : आयपीएल २०२२ च्या ४१ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर ४ विकेटनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत केकेआरने १४६ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल दिल्लीने विजयाचे लक्ष्य ६ विकेटच्या बदल्यात पार केले. दिल्लीकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ४२ धावा केल्या. पण अखेरच्या षटकात रोवमॅन पॉवेलने धमाकेदार फलंदाजी करत विजय मिळून दिला.

याआधी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाताची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाले. फिंच फक्त ३ तर वेंकटेश अय्यर ६ धावांवर बाद झाला.

त्यानंतरदेखील केकेआरची घसरण थांबली नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी एका पाठोपाठ एक विकेट घेतल्या आणि त्यांची अवस्था ४ बाद ३५ अशी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने एकाबाजूने किल्ला लढवला होता. पण तोदेखील ४२ धावांवर बाद झाला. केकेआरने ८३ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. पण मधल्या फळीतील नितीश राणाने रिंकू सिंहसह सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी करून संघाला समाधानकारक धावसंख्या उभी करून दिली. राणाने ३४ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांसह ५७ धावा केल्या, तर रिंकू सिंगने १६ चेंडूत २३ धावा केल्या. केकेआरने २० षटकात ९ बाद १४६ धावसंख्या उभी केली. दिल्लीकडून कुलदीप यादवने ४, मुस्तफिझुर रहमानने ३, तर चेतन सकारिया आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. पहिल्याच चेंडूवर पृथ्वी शॉ बाद झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने डाव सावरला, त्याने २६ चेंडूत ४२ धावा केल्या. पण केकेआरप्रमाणे दिल्लीनेदेखील ठराविक अंतराने विकेट गमावल्या. अखेरच्या काही षटकात पॉवेल आणि अक्षर पटेल यांनी कोलकाताच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. पॉवेलने १६ चेंडूत ३ षटकार आणि १ चौकारासह नाबाद ३३ धावा करत संघाला विजय मिळून दिला. पटेलने १७ चेंडूत २४ धावा केल्या. कोलकाताचा या हंगामातील हा सलग पाचवा पराभव ठरला.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या