32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeक्रीडापराभवानंतरही दिल्ली प्रथमस्थानी; पंजाबला चार विजयांंची गरज

पराभवानंतरही दिल्ली प्रथमस्थानी; पंजाबला चार विजयांंची गरज

एकमत ऑनलाईन

किंग इलेव्हन पंजाब चे दहा सामन्यानंतर चार विजयासह आठ गुण झाले आहेत त्याना अव्वल चारांंचे आव्हान राखण्यासाठी उरलेल्या चारही सामन्यात विजय मिळवावाच लागेल. तळात असलेल्या संघांकडून पराभव स्वीकारल्यास अव्वल संघांना काही फरक पडत नाही. शिखर धवनच्या नाबाद शतकी खेळीनंतरही दिल्लीला आज पंजाबच्या सामुहिक प्रयत्नांसमोर दुबईवर पराभव स्वीकारायला लागला. पंजाबने हा सामना पाच गडी व सहा चेंडू राखून जिंकताना गुणतक्त्यात सातव्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली. गेल्या काही सामन्यांमध्ये पाठलाग करणाऱ्या संघाना विजय मिळवायला सुरुवात केली आहे दिल्लीचा संघाने नाणेफेक जिंकल्या नंतर प्रथम फलंदाजी घेऊन फार मोठी चूक केली असं श्रेयस अय्यरला वाटलअसेल. खेळपट्टीवर चार चार सामने झाले असल्यामुळे खेळपट्टी संथ झाली आहे ्यामुळे दुसर्‍यांदा फलंदाजी करणाऱ्यां संघाना चांगला फायदा होतो आहे गेल्या पंधरा सामन्यात एकाही संघाला द्विशतकी मजल मारता आलेली नाही त्यामुळे धावांचा बचाव करणे प्रथम फलंदाजी करणाराना अवघड जाते

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीचा डाव चांगल्या सुरवातीनंतर पावणे दोनशेच्या आत रोखण्यात पंजाबला यश आले. दिल्लीला २० षटकांत ५ बाद १६४ धावांची मजल मारता आली.चांगल्या सुरवातीनंतरही मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आल्यामुळे दिल्लीचा डाव अडचणीत सापडला. सलामीचा फलंदाज शिखर धवन अखेरपर्यंत टिकल्यामुळेच्या त्यांना समाधानकारक धावांपर्यंत पोचता आले. दिल्लीला खरे तर तशी चांगली सुरवात मिळाली होती. धवन आधीच्या सामन्यातील खेळी जणू पुढे खेळत होता. पण, पृथ्वी शॉ चौथ्या षटकांत बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरने सावध सुरवात केली. पण, तो देखील १४ धावांवर बाद झाला. त्यानंतर रिषभ पंत देखील चांगल्या खेळीनंतर १४ धावांपर्यंतच पोचू शकला. तोपर्यंत टिकून राहिलेल्या शिखरला नाही म्हणायला मार्क्स स्टोईनिसची साथ मिळाली. पण, त्यांच्या भागीदारीत सर्वाधिक धावा धवनच्याच होत्या. ३५ धावांच्या भागीत स्टाँईनिशने फक्त नऊ धावा केल्या तर गब्बरने २६ .शिखर धवनच्या नाबाद खेळीमुळेच हे शक्य झाले. आधीच्या सामन्यात एक हाती विजय मिळवून देणारा शिखर आजही एक हातीच दिल्लीचा तारणहार होता. मात्र, या वेळी त्याला समोरुन कुणाची साथ मिळाली नाही.

आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने ५ बाद १८७ धावा केल्या. निकोलस पूरनचे अर्धशतक आणि ग्लेन मॅक्सवेलची चाळीशी त्यांना पुरेशी ठरली सलग दुसऱ्या सामन्यात पंजाबची राहुल-मयांक ही सलामी अपयशी ठरली. राहूल लवकर बाद झाला. त्यानंतर ख्रिस गेल (१९चेंडूत३३)आपल्या नेहमीच्या शैलीत आल्या आल्या दोन षटकार व तीन चौकार मारुन जबाबदारी संपल्यासारखा तंबूत परत फिरला. युनिव्हर्सल बॉस न जबाबदारी स्वीकारून खेळण्याची गरज आहे लगोलग मयांकही बाद झाला. पाँवर प्लेच्या सहा षटकातच ५६धावात तीन मोहरे तंबूत परतलेले असताना निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी दिल्लीच्या गोलंदाजांना चांगली लढत दिली. त्यांनी ४० चेंडूंतच ६९ धावा केल्या.निकोलस पूरन २८चेंडूत६चौकार व तीन षटकारासह ५३धावांची फटकेबाजी करून बाद झाला. नंतर ग्लेन मॅक्सवेलन दीपक हुडाच्या साथीत पंजाबला विजयाजवळ नेले. दीपक हुडा आणि निशामने पंजाबचा विजय साकार केला. अर्थात, त्यांना नशिबाची चांगली साथ मिळाली. धवनच्या थ्रोवर यष्टीरक्षक पंतला पूरनला धावबाद करता आले नाही. तर, त्यानंतर त्यांच्या बहुतेक फलंदाजांचे चुकलेले फटके हवेतून अनेकदा क्षेत्ररक्षकांच्या पुढे, तर कधी क्षेत्ररक्षक नसलेल्या जागी पडला

आयपीएलच्या इतिहासात पहिले शतक ठोकण्यासाठी धवनला तेराव्या आयपीएलचा मुहुर्त लागला. त्यानंतर लगेच पुढच्याच सामन्यात आणखी एक शतक ठोकून त्याने इतिहास रचला. धवनने आज किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळताना ५७ चेंडूंत शतक झळकाविताना १२ चौकार आणि ३ षटकार ठोकले. यापूर्वी शारजाह येथे चेन्नई विरुद्धच्या सामन्यात शिखर धवने ५८ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या तोच अर्धवट डाव त्याने पुढे पंजाब विरुद्ध सुरू केला महत्वाच म्हणजे तो अजूनही नाबाद आहे त्याने आयपीएलमधील ५ हजार धावांचा टप्पाही गाठला. अशी कामिगरी करणारा तो पाचवा फलंदाज आणि चौथा भारतीय ठरला. योगायोग म्हणजे धवनने आजच आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला १० वर्षे पूर्ण केली

डॉ.राजेंद्र भस्मे

नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा – छगन भुजबळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या