23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयदिल्लीच्या सीमा खुल्या, रेस्टॉरंट-मॉलही उघडणार

दिल्लीच्या सीमा खुल्या, रेस्टॉरंट-मॉलही उघडणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव देशभरात कायम असला आणि रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असली. तरी केंद्र सरकारने काही प्रमाणात शिथिलता देण्यास सुरुवात केली आहे. राजधानी दिल्लीही हातपाय पसरण्यास सुरुवात करत आहे. दिल्लीशी संलग्न अन्य राज्यांच्या सीमा उद्यापासून (सोमवार, 8 जून) खुलणार असून रेस्टॉरंट, मॉलही उघडणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.

राजधानीत उद्यापासून सर्व रेस्टॉरंट्स, मॉल्स आणि धार्मिक स्थळे उघडली जातील. उद्यापासून आम्ही दिल्लीच्या सीमारेषा उघडत आहोत. हरियाणा आणि उत्तर प्रदेशला जोडलेल्या सीमा खुलतील, असं अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं. दिल्लीत निवासाची हॉटेल आणि बँक्वेट हॉल मात्र तूर्तास बंद राहतील, असं अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. याआधीही दिल्लीने नागरिकांना अधिक शिथिलता दिली होती, त्यानंतर रुग्णसंख्या वाढल्याचं दिसलं होतं. जून महिन्याच्या अखेरीस दिल्लीला 15 हजार बेडची आवश्यकता असेल. दिल्लीची रुग्णालये फक्त दिल्लीतील रहिवाशांसाठी उपलब्ध असतील, तर केंद्रीय रुग्णालये सर्वांसाठी खुली राहतील. न्यूरोसर्जरीसारख्या विशेष शस्त्रक्रिया केली जाणारी रुग्णालये वगळता खासगी हॉस्पिटल्सही दिल्लीकरांसाठी आरक्षित आहेत, असं केजरीवाल यांनी सांगितलं.

खबरदारीचा उपाय म्हणून, ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह इतरांशी, विशेषत: लहान मुलांशी कमीत कमी संपर्क ठेवला पाहिजे, कारण वृद्ध कोविड संसर्गाची सर्वाधिक भीती असते. आपल्या घराच्या एका खोलीतच राहण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केलं.

Read More  आत्महत्येसाठी ट्रॅकवर झोपला तरूण; ट्रेनमधून उडी मारून चालकाने वाचविला जीव!

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या