26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात दिल्लीचीच सत्ता ; अजित पवारांचा हल्लाबोल

महाराष्ट्रात दिल्लीचीच सत्ता ; अजित पवारांचा हल्लाबोल

एकमत ऑनलाईन

पुणे : महाराष्ट्रातील सरकार दिल्लीहून चालत आहे. त्यामुळे दिल्लीतील आदेशाशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणताच निर्णय घेऊ शकत नाहीत. या दोघांच्या हातात आता काहीच उरले नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. पुण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यलयाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

रोज माध्यमाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची विचारणा केली जात आहे. मात्र त्यांच्याकडून लवकरच होईल, असे उत्तर गेले अनेक दिवस आपण ऐकतो आहोत. यांच्या या कारभारामुळे महाराष्ट्राचे नुकसान होते आहे. आमचे सरकार असताना आम्ही असा पेच निर्माण होऊ दिला नव्हता, असेही ते म्हणाले.

महापालिकेची तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द करण्यात आली आणि चार सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रभाग रचना बदलण्याची जी पावलं या नव्या सरकारने उचलली आहेत, त्यानुसार पुढच्या फेब्रुवारीच्या आसपास निवडणुका होतील, असे बोलले जात आहे. मात्र कोणी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने आधीच्या प्रक्रियेनुसार निवडणुका घ्यायला लावल्या, तर कधीही निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे निवडणुकीसाठी सज्ज रहा, अशाही सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

सरकार किती दिवस चालेल सांगता येत नाही
सत्तेत असताना मंत्री आणि आमदार प्रशासन अधिका-यांशी कसे वागले, याची फळं सत्तेतून बाहेर पडल्यावर मिळतात. कारण ते प्रशासकीय अधिकारी विरोधात असणा-या नेत्यांना धडा शिकवतात. त्यामुळे हे सरकारसुद्धा किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बरेच काही अवलंबून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या