31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeमहाराष्ट्रगरिबांना मोफत लसीची केंद्राकडे मागणी - आरोग्यमंत्री राजेश टोपे

गरिबांना मोफत लसीची केंद्राकडे मागणी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

एकमत ऑनलाईन

मुंबई : केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत ७ जानेवारीला बैठक होणार आहे. या बैठकीत गरिबांना मोफत लस देण्यासाठी केंद्राने मदत करावी, अशी मागणी करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितले. जर केंद्राने तसे केले नाही तर राज्यातील अखत्यारीतील लोकांना वा-यावर सोडले जाणार नाही. असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. श्रीमंत लोक कोरोना लसीसाठी खर्च करू शकतात मात्र, गरिबांवर ५०० रुपयांचा खर्च लादणे योग्य नाही, असे टोपे म्हणाले. राज्याकडे ज्या गोष्टींची कमतरता आहे, त्याची माहिती आम्ही केंद्राला सांगितली आहे. लोकलबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे राजेश टोपे म्हणाले.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ८ जानेवारीला ड्राय रनचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात २ जानेवारीला पुणे, नागपूर, जालना, नंदुरबारमध्ये ड्राय रन पार पडले होते. महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे ड्राय रन होणार आहे. त्यामध्ये टेस्टिंग होईल, त्यामुळे जेव्हा प्रत्यक्षात लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जाईल तेव्हा कुठलीही अडचण येणार नाही, असे राजेश टोपे म्हणाले. कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरळीतपणे राबवता यावा म्हणून ड्राय रन घेण्यात येत आहे, असे राजेश टोपेंनी सांगितले.

सर्वांनी काळजी घेण्याची गरज
नव्या विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात नव्या कोरोनाचे ८ रुग्ण आढळले आहेत. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या अहवालानुसार नवीन विषाणू झपाट्याने पसरतो. त्यामुळे सर्वांनी अधिक सतर्क राहणे, काळजी घेणे महत्त्वाचे, पण घाबरण्याची गरज नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. कोरोनाविषयक नियम जनहितासाठी बनवण्यात आले आहेत. एक आदर्श नागरिक म्हणून त्यांनी ते पाळले पाहिजेत, कायदा हा सर्वांसाठी समान आहे, कायद्याच्या वर कोणीही नाही, याचा विचार करून सर्वांनी वागले पाहिजे,असेही राजेश टोपे म्हणाले.

राज्याचा रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर
महाराष्ट्रात सध्या दिवसाला २ ते ३ हजार नवीन रुग्ण आढळत आहेत. राज्यात काही दिवसांपूर्वी दर दिवशी २५ ते ३० हजार रुग्ण आढळत होते. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ९६ टक्के आहे. कोरोनाच्या नव्या अवताराबाबत आम्ही सतर्क आहोत. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी ब्रिटनहून आलेल्या विमानांमधून येणाºया प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला. आम्ही आमच्या प्रोटोकॉलनुसार अंमलबजावणी कायम ठेवणार, तसे केंद्राशी पत्रव्यवहार करून इतर राज्यांत देखील प्रोटोकॉल कायम राहावे, यासाठी सांगण्यात येणार आहे जेणेकरून इतर राज्यांतून आपल्या राज्यात रुग्णसंख्या वाढू नये,असे राजेश टोपे म्हणाले.

बायडन यांच्या शपथविधी आधीच ट्रम्प अमेरिका सोडणार!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या