पंढरपूर : तब्बल दोन वर्षानंतर यंदा आषाढी यात्रा निर्बंधमुक्त साजरी होणार आहे. यंदा आषाढीसाठी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे निघाले आहेत.
आज सकाळी ७ वाजता शेगावहून संत गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं. त्यानंतर, दुपारी नागझरी येथे आगमन आणि पारस येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. शेगावच्या या दिंडीचं हे ५३वर्ष.
७०० भाविकांसह सकाळी शेगाव येथील मंदिरातून ही दिंडी पायी ७५० किमी जाणार असून पाच जिल्ह्यातून प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहचणार आहे.
कोरोना, लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर आज संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरसाठी शेगाव येथून निघाली आहे. या दिंडी सोहळ्यात ७०० वारकरी सामील झाले आहेत.
ही दिंडी पाच जिल्ह्यातून जाणार असून तब्बल ७५० किमी अंतर पार करून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचणार आहे. वारक-यांचे पांढरे शुभ्र कपडे, अत्यंत शिस्तीत चालणारी पावलं अशी या दिंडीची ओळख आहे. यावर्षी संत गजानन महाराजांच्या दिंडीचं हे ५३वर्ष आहे.