23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रसंत सोपानदेव पालखीचे प्रस्थान

संत सोपानदेव पालखीचे प्रस्थान

एकमत ऑनलाईन

सासवड : संत ज्ञानेश्वर माउलींचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांच्या पालखीने शनिवारी (२५ जून) आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवले. दुपारी दीड वाजता सासवड येथील संत सोपानदेवांच्या समाधी मंदिराजवळ हजारो वारक-यांच्या उपस्थितीत फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये पादुका ठेवल्यानंतर पालखी सोहळ््याने पंढरपूरकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.

टाळ-मृदंगाच्या तालावर ज्ञानोबा माउली तुकाराम व संत सोपानदेवांचा जयघोष करीत वारकरी आनंदाने नाचू लागले. या वेळी आमदार संजय जगताप, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, सासवडचे मुख्याधिकारी निखील मोरे आदी उपस्थित होते.

आज पहाटे ४ वाजता मंदिरात समाधीची काकडआरती, पवमान अभिषेक, महापूजा आदी कार्यक्रम झाल्यानंतर वारक-यांची दर्शनासाठी मोठी रांग लागली. दुपारी ज्ञानेश्वर माउलींकडून परंपरागत मानाचा नैवेद्य आल्यावर कीर्तन झाले. त्यानंतर सोपानदेव देवस्थान ट्रस्ट, संत सोपानकाका बँक व अन्य संघटनांकडून आणि सासवड नगरपालिका यांच्याकडून दिंडीप्रमुखांचे सत्कार करण्यात आले.

पालखी सासवड नगरीतून खांद्यावर नेऊन जेजुरी नाक्यावर फुलांनी सजविलेल्या रथामध्ये ठेवण्यात आली व सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. पालखी सोहळ््यात राज्याच्या विविध भागातील ९७ मानाच्या दिंड्या आहेत, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख अ‍ॅड.त्रिगुणमहाराज गोसावी यांनी दिली. पालखी सोहळ््याचा शनिवारी पांगारे येथे मुक्काम आहे. तसेच श्री संत योगीराज चांगा वटेश्वर महाराज पालखी सोहळ््याचेही सासवडमधून दुपारी दीड वाजता प्रस्थान झाले. पालखीच्या पुढे व मागे मानाच्या दिंडी आहेत. पारगाव मेमाणे, यवत, इंदापूरमार्गे सोहळा पंढरपूरला पोचणार आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या