23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रउपमुख्यमंत्री फडणवीस-राज ठाकरेंची भेट

उपमुख्यमंत्री फडणवीस-राज ठाकरेंची भेट

एकमत ऑनलाईन

मुंबई : नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली. तब्बल तासभर दोघांमध्ये चर्चा झाली. दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिवतीर्थवर ही भेट घेतल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. मात्र या दोघांच्या भेटीत आगामी पालिका निवडणुकीबाबत खलबते झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पत्र लिहून कौतुक केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. आज देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची विचारपूस करण्याच्या उद्देशाने ही भेट नियोजित आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या काळात राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया पार पडली. या काळात त्यांची भेट घेणे शक्य न झाल्यामुळे फडणवीस त्यांच्या भेटीसाठी गेल्याचे म्हटले जात आहे.

शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर भाजपसोबत एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. भाजप सत्तेत आली मात्र मुख्यमंत्री पदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली. तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. फडणवीस पुन्हा सत्तेत आल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून पत्र लिहून फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले होते. त्यामुळे शिवसेनेतील बंडानंतर झालेल्या या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

राज ठाकरेंच्या भूमिकेचे भाजपकडून स्वागत
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. त्यावेळी राज ठाकरेंच्या भूमिकेचे भाजपकडून स्वागत करण्यात आले होते. राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे भाजप आणि मनसे यांच्यातील युतीच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यामुळे आजची भेट ही सदिच्छा भेट होती की, राजकीय रणनीती आखणारी होती, हे येणारा काळच सांगेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या