24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रदेशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. १३ मे पर्यंत ही कोठडी वाढली असल्याने त्यांचा न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुख यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने आणखी १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस त्यांना कोठडीतच काढावे लागणार आहेत.

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यावेळी मागली सुनावणीदरम्यान, देशमुख यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी विनंती सीबीआयच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, विशेष सीबीआय कोर्टाने ही विनंती फेटाळली आणि देशमुख यांना २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली होती. आता पुन्हा एकदा आज शुक्रवारी न्यायालायने ही कोठडी १४ दिवसांपर्यंत वाढवून १३ मे पर्यंत केली आहे.

दरम्यान, देशमुख सध्या सीबीआय कोठडीत आहेत. आज त्यांना आणखी १४ दिवसांची कोठडी वाढवून देण्यात आली आहे. ज्या पोलिसांच्या बदल्यांबाबत तपास करायचा आहे त्यांची चौकशी करायची असल्याने देशमुख यांना मध्यंतरी तीन दिवस अधिक कोठडी द्यावी, अशी मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली होती. सीबीआयने रिमांडसाठी दिलेली कारणे असमाधानकारक आहेत, असे मत न्यायालयाने व्यक्त करत त्यांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आज शुक्रवारी त्यावर पुन्हा न्यायालयाने निर्णय दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या