26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रदेशमुखांचा सीबीआय कोठडीतला मुक्काम वाढला

देशमुखांचा सीबीआय कोठडीतला मुक्काम वाढला

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे देशमुखांचा सीबीआय कोठडीतला मुक्काम वाढला. तसेच, देशमुखांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर ईडीने देशमुखांना अटक केली होती. त्यानंतर सीबीआयनेही कारागृहात जाऊन देशमुखांची गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी केली होती.

सीबीआयने देशमुख आणि त्यांचे कथित सहकारी स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्यावर आरोपपत्र दाखल केले असून बडतर्फ पोलीस अधिक्षक सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे. त्याप्रकरणात देशमुख यांनी डिफॉल्ट जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

मात्र, न्यायालयाने अद्याप देशमुखांना दिलासा दिलेला नाही.
दाखल केलेले आरोपपत्र केवळ ५९ पानांचे असून आरोपपत्र अपूर्ण आहेत. तसेच ताब्यात घेतल्याच्या ६० दिवसांच्या आत चौकशी पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच तपास पूर्ण झाल्याशिवाय अपूर्ण आरोपपत्र दाखल करण्यात आल्यामुळे देशमुख डिफॉल्ट जामीनासाठी पात्र असल्याचा दावाही देशमुखांनी याचिकेतून केला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या