24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeआंतरराष्ट्रीयदुर्गापुजेतील हिंसाचारानंतर इस्कॉनच्या मंदिराची नासधूस

दुर्गापुजेतील हिंसाचारानंतर इस्कॉनच्या मंदिराची नासधूस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बांगला देशातील दुर्गा पूजा मंडपावरील हल्ल्यानंतर शुक्रवारी अल्पसंख्याक हिंदू समुदाय आणि त्यांचे मुख्य धार्मिक स्थळ पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले. नोआखलीमध्ये जमावाने इस्कॉन मंदिरावर हल्ला केला आणि त्याची जोरदार तोडफोड केली. तेथे उपस्थित असलेल्या भाविकांना मारहाणही केली. अनेक यात्रेकरूंची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यामध्ये एका भक्ताची जमावाकडून हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

नोआखली भागातील इस्कॉन मंदिराची कथितपणे तोडफोड करण्यात आली आणि जमावाने मंदिराच्या एका सदस्याची हत्या केली. शुक्रवारी रात्री इस्कॉनने सांगितले की बांगलादेशातील नोआखली येथे जमावाने त्याच्या मंदिरावर आणि भाविकांवर हिंसक हल्ला केला आहे. २०० पेक्षा जास्त लोकांच्या जमावाने इस्कॉनचे सदस्य पार्थ दास यांची हत्या केल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. इस्कॉनने सांगितले की त्याचा मृतदेह मंदिराशेजारी असलेल्या एका तलावात सापडला आहे.

मंदिराचे बरेच नुकसान
इस्कॉनच्या एका ट्विटमध्ये या हल्ल्याची माहिती देणारी भयानक चित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. आज बांगलादेशच्या नोआखली येथे इस्कॉन मंदिर आणि भाविकांवर जमावाने हिंसक हल्ला केला. मंदिराचे बरेच नुकसान झाले आहे आणि अनेक भाविकांची स्थिती गंभीर आहे. आम्ही बांगलादेश सरकारकडे हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करण्याची आणि दोषींना न्याय देण्याची मागणी करतो, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या