27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात देवेंद्र फडणवीसांचं एककलमी नेतृत्व ; अनिल बोंडेंची कबुली

राज्यात देवेंद्र फडणवीसांचं एककलमी नेतृत्व ; अनिल बोंडेंची कबुली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात देवेंद्र फडणवीसांविषयी आदर आहे. आजही मी मेसेज करताना मुख्यमंत्री महोदय.. .असे मेसेज करून जातो. पण त्याला आता उप लागलेले आहे, हे विसरतो. जनतेच्या मनातली भावना कुणीही काढू शकत नाहीत. आजही राज्यात देवेंद्र फडणवीसांचं एककलमी नेतृत्व आहे, असे वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीसांना केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर उपमुख्यमंत्री व्हावे लागले, यामुळे भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यानंतर आता २१ दिवस उलटत असतानाही भाजपच्या नेत्यांनी असे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप नेत्यांच्या मनातील खदखद अजूनही शमलेली नाही का, असा सवालही यानिमित्ताने विचारला जातोय. कालच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील यासंदर्भात वक्तव्य केलं.

अनिल बोंडे काय म्हणाले?
राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबाबत बोलताना अनिल बोंडे म्हणाले, ‘ जनतेच्या मनात कार्यकर्त्यांच्या मनात देवेंद्र फडणवीसांविषयी भावना आहे. मी ही मेसेज करताना करून जातो मुख्यमंत्री महोदय.. पण त्याला आता उप लागलेले आहे. जनतेच्या मनातली भावना कोणी काढू शकत नाही. मात्र राज्यात एककलमी नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीसचं आहेत..असे अनिल बोंडे म्हणाले.

राऊतांनी तब्येतीची काळजी घ्यावी
अनिल बोंडे यांनी यावेळी संजय राऊतांनाही खोचक सल्ला दिला. राऊतांनी भाजपवर टीका करताना तब्येतीची काळजी घ्यावी. संजय राऊत मोठे नेते आहेत ते कोणाचं ऐकतील असं वाटत नाही. त्यांना तब्येतीचा काळजी घेण्याचा सल्ला मी दिला.. त्यांना दुसरं काय देणार कारण ते कोणाचं ऐकणार. सध्या ते बेताल वक्तव्य करत आहेत. पण अशी वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करता येते मात्र कोर्टाची आणि निवडणूक आयोगाची नाही. शिवसेना कोणाची हे निवडणूक आयोग ठरवेल, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या