28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रभाविकांची कार थेट गोदापात्रात ; मोठा अनर्थ टळला

भाविकांची कार थेट गोदापात्रात ; मोठा अनर्थ टळला

एकमत ऑनलाईन

नाशिक : धार्मिक विधीसाठी नाशिकमधील गोदाकाठी रामकुंड येथे आलेल्या भाविकांची कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट गोदावरी नदीपात्रात गेल्याची घटना बुधवारी (दि. ११) सकाळी ११ च्या सुमारास घडली. गोदावरीला पाणी कमी असल्याने सुदैवाने चालक बचावला व मोठा अनर्थ टळला. रामकुंड येथे काही धार्मिक विधी करण्यासाठी आज सकाळी परजिल्ह्यातील भाविक कार (एमएच १४ एफएम १७३६) घेऊन आले होते.

यशवंत महाराज पटांगणजवळ भाविकांना उतरवून चालक ही कार पार्क करत असताना नियंत्रण सुटल्याने कार थेट गोदापात्रात शिरली. सुदैवाने नदीला पाणी कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. घटना घडल्यानंतर काही नागरिकांनी तातडीने धाव घेत चालकाला सुखरूपपणे बाहेर काढले. काही वेळाने क्रेनच्या साहाय्याने कारही नदीबाहेर काढण्यात आली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या