24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeविश्वचषकाच्या संघात धोनीला स्थान नाही

विश्वचषकाच्या संघात धोनीला स्थान नाही

एकमत ऑनलाईन

चाहत्यांचा आकाश चोप्रावर रोष

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा आॅक्टोबरपासून होणार आहे. ही स्पर्धा होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पण या विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या एका संघात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला स्थान न दिल्यामुळे चाहते चांगलेच भडकलेले पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने आपला विश्वचषकासाठीचा संघ जाहीर केला होता. या संघात आकाशने धोनीला स्थान दिले नव्हते. त्यामुळे आता चाहते त्याच्यावर चांगलेच भडकलेले पाहायला मिळत आहेत.

Read More  तब्बल 18 फुटांपर्यंत जाऊ शकतो सोशल डिस्टन्सिंग

धोनीच्या जागी आकाशने विश्वचषकाच्या संघात रिषभ पंतला स्थान दिले होते. त्यानंतर धोनीचे चाहते आकाशवर चांगलेच भडकलेले पाहायला मिळत आहेत. याबाबत आकाश चोप्राने भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरला सांगितले की, धोनीला संघात न घेतल्यामुळे माझ्यावर लोकांनी भरपूर टीका केली आहे. काही टीकाकारांनी तर माझ्या मुलांनाही नाही सोडले. त्यामुळे मी या चाहत्यांना सांगू इच्छितो की, मला माफ करा. ती गोष्ट घडून गेली आहे, त्यामुळे त्या गोष्टीवर आता भाष्य करणे योग्य नाही. आकाश पुढे म्हणाला की, क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायची की नाही, हा धोनीचा निर्णय असेल. त्याला संघात घ्यायचे की नाही हा निवड समितीचा निर्णय असेल. धोनी किती फिट आहे, यावर त्याला संघात स्थान द्यायचे की नाही, हे ठरवावे लागणार आहे. धोनी एक वर्ष संघाच्या बाहेर आहे, त्यामुळे त्याला संघात पुनरागमन करणे सोपे नसेल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या