24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रदुहेरी हत्याकांडाने धुळे हादरले

दुहेरी हत्याकांडाने धुळे हादरले

एकमत ऑनलाईन

धुळे : धुळे तालुक्यातील तरवाडे गावात धारदार शस्त्राने वार करून मायलेकींची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. धुळे तालुक्यातील तरवाडे या गावात हॉटेल व्यवसाय करणा-या चंद्रभागाबाई माळी (वय वर्षे ६५) आणि त्यांची मुलगी वंदना महाले (वय वर्षे ४५) यांचा पहाटेच्या दरम्यान धारदार शस्त्राने खून करण्यात आला. दोन्ही मायलेकींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यामध्ये आढळून आले.

धुळे तालुक्यातील तरवाडे या गावामध्ये खुनाच्या घटनेने एकच खळबळ उडाली. यासंदर्भात धुळे तालुका पोलिसांना तात्काळ या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी ंिफगरंिप्रट एक्सपर्ट त्याचबरोबर इतर तपास यंत्रणांच्या माध्यमातून तपासाला सुरवात केली आहे. खुनाचे कारण अजून समजू शकले नाही. तालुका पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गावातील एका संशयिताला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.

वैवाहिक वाद सुरू असल्यामुळे मुलगी वंदना महाले आईकडेच राहत होती. आणि तरवाडे गावातच हॉटेल व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होती. मात्र आज पहाटे मायलेकींचे रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने या संदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत. मायलेकींचे मृतदेह धुळे पोलिसांनी ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पुढील तपास धुळे तालुका पोलिस करत आहेत. या संदर्भात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सध्या सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या