27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरे यांच्यावर संस्कार केलेत की नाही?

आदित्य ठाकरे यांच्यावर संस्कार केलेत की नाही?

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘आदित्य ठाकरे यांच्यावर काही संस्कार केले आहेत की नाही? की लहानपणी ते गल्ली- बोळांत फिरत होते,’ अशा शब्दांत बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. राज्यात फडणवीस-शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य ठाकरे राज्यभरात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. तसेच जाहीरसभा घेत शिंदे-फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. आदित्य ठाकरेंच्या याच सभेवरून शहाजीबापू पाटील यांनी निशाणा साधला आहे.

आमची गद्दारी नाही तर खुद्दारी आहे. उद्धव ठाकरे काही बोलले तर त्यांचे शब्द आमदारांच्या जिव्हारी लागणार नाहीत. पण आदित्य ठाकरेंसारख्या लहान पोराने असे बोलणे चुकीचे आहे. इथे प्रत्येक आमदारांचे वय कोणाचे ५०, कोणाचे ६०, कोणी ६५ वर्षांपेक्षा जास्त आहे. आपण आपल्या घरात वडीलधा-यांना आदराने, सन्मानाने बोलतो.

हा संस्कार आपल्याला आईने लहाणपणीच दिलेला असतो. पण या पोराला काही शिकवलंय की नाही हे समजत नाही. की हे पोरगं बाहेर गल्लीत हिंडत होतं, हेही समजत नाही, अशा शब्दांत शहाजीबापू पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

तसेच, यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या राजीनामा देण्याच्या विधानावरही भाष्य केले. शिवसेनेचे चाळीस आमदार एकत्रित असल्याने आमचे बहुमत आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, उलट बहुमत गमावलेल्या आदित्य ठाकरे यांच्यासह उर्वरित १५-१६ आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असा पलटवार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या