18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्र‘सामना’ कार्यालयात ‘खोके’ पोहोचले का?; मनसेच्या जाहिरातीवरून नवा वाद

‘सामना’ कार्यालयात ‘खोके’ पोहोचले का?; मनसेच्या जाहिरातीवरून नवा वाद

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज एक ट्विट करून खोक्यांवरून सुरू असलेल्या वादात उडी घेतली आहे. दैनिक ‘सामना’मध्ये पहिल्या पानावर छापून आलेल्या जाहिरातीवरून देशपांडेंनी ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

दैनिक ‘सामना’च्या याच जाहिरातीवरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ‘खोके’ ‘सामना’मध्ये पोहोचले का? असे ट्विट केले आहे. शिंदे गटातील ४० आमदारांनी खोके घेतल्याचे आरोप होत आहेत. आत्ताच आ. बच्चू कडू आणि आ. रवी राणा यांच्यातील खोके वादावर पडदा पडला आहे. त्यात देशपांडे यांच्या ट्विटने भलतीच चर्चा रंगत आहे.

आजच्या अंकात पहिल्या पानावर राज्य सरकारची पूर्ण पान जाहिरात आहे. यामध्ये स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याने ७५ हजार रोजगार देण्याचा महासंकल्प केल्याचे सांगण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या रोजगार मेळाव्यात रोजगार मिळालेल्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या