23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रचेले चपाटे गेले, तुमच्या मार्गातील अडथळे दूर झाले

चेले चपाटे गेले, तुमच्या मार्गातील अडथळे दूर झाले

एकमत ऑनलाईन

उद्धव ठाकरे यांनी पल्लवीत केल्या आशा
मुंबई : शिवसेनेला मुळापासून हादरवून टाकणारे आतापर्यंतची सर्वात मोठी फूट पाहायला मिळाली. पण या परिस्थितीतही सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच या कार्यकर्त्यांमधील आशाही त्यांनी आता पल्लवित केल्या. चेले चपाटे गेले अन् तुमच्या मार्गातील अडथळे दूर झाले, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आशा जागवल्या आहेत.

मातोश्रीवर भेटायला आलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, प्रत्येकवेळी मी येणा-या संकटाला संधी मानत आलो आहे, तशी आता आपल्याला संधी आहे. शहापूरचे जिल्हा परिषद सदस्य मला भेटायला आले होते. आता त्यांच्या मार्गातला अडथळा निघून गेला. तसेच तुमच्या मार्गातील अडथळाही निघून गेला. तुमच्यात आणि मातोश्रीमध्ये ज्यांनी भिंत बांधली होती ती आता पडून गेली आहे. आता बांध मोकळा झाला आहे. निष्ठावंतांना डावलून जे चेले चपाटे पुढे आले होते ते चेले चपाटे आता गेले. ज्यांच्या श्रमावर ते मोठे झाले, त्या शिवसैनिकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

साधी माणसे हीच माझी ताकद
सध्याचा हा थोडासा कठीण काळ आहे, जो लवकरच निघून जाईल. आपण संघर्ष करु, ज्यांना मोठे केले ती माणसे गेली. पण त्यांना मोठी करणारी साधी माणसे माझ्या सोबत आहेत. तीच माझी ताकद आहे. ही ताकद माझ्यासोबत आहे म्हणून मला संकटाची पर्वा नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या