कराची, ६ जून: फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने दाऊद आणि त्याची पत्नी महजबीन कोरोना पॉझिटीव्ह नसल्याचं म्हटलं आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर दाऊद इब्राहिम कोरोना पॉझिटीव्ह झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. दाऊदला सैन्याच्या रुग्णालयात दाखल केल्याचं देखील बोललं जात होतं. पण आता त्याच्या भावाने याबाबत हा खुलासा केला आहे.
दाऊदचे सुरक्षा रक्षक आणि घरातील इतर लोकांना क्वारंटाईन केल्याचं देखील बोललं जात होतं. पण न्यूज़ एजेंसी आयएनएसच्या माहिती नुसार, अनीसने म्हटलं की, त्याचा भाऊ हा कोरोना पॉझिटीव्ह नाही. तो आपल्या घरीच आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिम कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा सुरु आहे. पण भारतातील न्यूज एक्सने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनामुळे दाऊदचा कराचीत मृत्यू झाला आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
IANS ने दिलेल्या वृत्तानुसार, अनिस इब्राहिमने सांगितलं आहे की, “दाऊदच्या कुटुंबातील सर्वजण सुरक्षित असून कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. सर्वजण घरात सुरक्षित आहेत”. यावेळी अनिसने संयुक्त अरब अमिराती आणि पाकिस्तानधून आपलं काम सुरु असल्याची कबुली दिली आहे. याआधी दाऊदच्या कर्मचाऱ्यांनी क्वारंटाइन करण्यात आल्याचं वृत्त होतं.
𝗔𝘂𝗱𝗶𝗼
"Bhai (#Dawood) is fine & Shakeel is also fine. No one has tested positive for #coronavirus. No one from our family is admitted in hospital," said Anees.
Intelligence reports had earlier said that Dawood & his wife have tested positive for #COVID19. #DawoodIbrahim pic.twitter.com/HPjU2lanpH
— IANS Tweets (@ians_india) June 5, 2020