24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयज्येष्ठांची रेल्वे तिकिटावरील सवलत बंद!

ज्येष्ठांची रेल्वे तिकिटावरील सवलत बंद!

एकमत ऑनलाईन

कोरोनानंतर सूट नाहीच, तिकिटामध्ये मिळत होती ५० टक्के सूट, यापुढे विचार नाही

नवी दिल्ली : कोरोनाचे संकट येण्यापूर्वी ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात ५० टक्के सूट मिळत होती. मात्र, कोरोना काळात रेल्वे सेवा बंद झाल्यावर ही सूट रद्द करण्यात आली होती. तथापि, कोरोनाचे सावट संपल्यानंतर रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झाली. परंतु ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सूट पुन्हा सुरू झाली नाही. एवढेच नव्हे तर भविष्यातही ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात सवलत देण्याचा सरकारचा विचार नाही, असे रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितले.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज संसदेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत देण्यात येत होती. कोरोना अगोदर ती कायम सुरू होती. मात्र, ज्येष्ठांना ही सवलत दिली गेल्याने सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत आहे. त्यामुळे सरकार सध्या त्यावर विचार करीत नाही. अर्थात तो भार दूर करण्यासाठी कोणतीही योजना अद्याप नाही. त्यामुळे सध्या तरी ही सवलत पूर्ववत सुरू करण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात माहिती देताना रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले की, २०१७-१८ मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तिकिटावरील सवलतींमुळे रेल्वेवर १,४९१ कोटी रुपयांचा बोजा पडला होता. ही रक्कम २०१८-१९ मध्ये १६३६ कोटी रुपये आणि २०१९-२० मध्ये १६६७ कोटी रुपये होती. तसा विचार केल्यास जेष्ठांना सवलत दिल्याने रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसत होता. याचा विचार करतानाच रेल्वेची स्थिती पाहून रेल्वेला एवढी मोठी सवलत सहन करणे शक्य नाही. त्यामुळे पुढील काळात सवलत देण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.

ज्येष्ठांकडून १५०० कोटींची कमाई
रेल्वेने खेळाडू, ट्रान्सजेंडर, शहिदाची पत्नी, ज्येष्ठ नागरिक अशा १२ श्रेणींचे सवलतीचे भाडे केवळ तीन श्रेणींपुरते मर्यादित केले आहे. त्याचवेळी कोविडच्या नावाखाली २०२० पासून ज्येष्ठ नागरिकांसह ५३ श्रेणींमध्ये सवलत सुविधा बंद करण्यात आली. २०२१-२२ मध्येच ५० टक्क्यांपर्यंत सवलत बंद करून रेल्वेला सुमारे ३,४०० कोटी मिळाले आहेत. जगभरातील देश जिथे ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त सुविधा देत आहेत, तिथे भारताने सवलती बंद करून ज्येष्ठ नागरिकांकडून १५०० कोटी अतिरिक्त कमावले आहेत.

विशेष श्रेणींसाठी मात्र सवलत
विशेष श्रेणीतील लोकांसाठी भाड्यात सवलत देण्याची सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली. यामध्ये अपंगांच्या ४ श्रेणी, रुग्णांच्या ११ श्रेणी आणि विशेष विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडू तसेच इतर श्रेणीतील प्रवाशांसाठी ही सुविधा पुनर्संचयित केलेली नाही, असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या