22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभारत-बांगला देशमध्ये व्यापारावर चर्चा

भारत-बांगला देशमध्ये व्यापारावर चर्चा

एकमत ऑनलाईन

ढाका : भारत आणि बांगला देशमध्ये गुरुवारी उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी गुरुवारी बांगला देशचे समकक्ष डॉ. ए.के. अब्दुल मोमेन यांची भेट घेत बांग्लादेशच्या पंतप्रधान शेखा हसिना यांच्याशी चर्चा केली आहे. दोन्ही देशांच्या मैत्री दौ-यातील बैठक ढाका येथे झाली आहे. परराष्ट्र सचिव-नियुक्त विनय मोहन क्वात्रा हेसुद्धा या चर्चेदरम्यान उपस्थित होते. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये इंधनाच्या वाढत्या भावामुळे परिणाम झाला असून संयुक्त राष्ट्रामध्ये झालेल्या बैठकीत दोन्ही देशांनी सावधपणे मतदान केले होते.

बांगला देशच्या डॉ. ए.के. अब्दुल मोमेन यांच्यासोबत साकारात्मक चर्चा झाली. भारत आणि बांगला देशच्या संबंधातून सातत्याने प्रगती करण्यावर त्यांनी सहमती दर्शवली आहे. त्यासाठी दोन्ही देशांकतील भागीदारी पुढे नेण्यासाठी आमचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी आम्ही चर्चा करायला तयार आहोत असे ते म्हणाले आहेत असे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितले.

या भेटीदरम्यान जयशंकर यांनी पंतप्रधान मोदींचा संदेश बांगला देशच्या पंतप्रधान शेखा हसीना यांच्यापर्यंत पाठवला. तसेच युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या निर्बंधामुळे दोन्ही देशांनी व्यापार, वाणिज्य आणि दळणवळणावर भर दिला असून भारताने कोरोनाच्या काळात बांगला देशला मदत केली असल्याची माहिती बांगला देशच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या