26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना फोन केल्याची चर्चा?

मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना फोन केल्याची चर्चा?

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा फोन केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाकरे-फडणवीस यांच्यात २१ जून रोजी चर्चा झाल्याचं सूत्रांनी दिली आहे. ठाकरेंनी भाजप श्रेष्ठींनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही, अशी माहितीही सूत्रांनी दिली. शिवसेनेकडून मात्र या सर्व गोष्टी भूलथापा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी २० जूनच्या रात्री डॅमेज कंट्रोल करण्याचा पहिला प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीयांच्या फोनवरुन देवेंद्र फडणवीस यांना फोन करण्यात आला.

पक्षामध्ये विभाजन होण्यापेक्षा, गुवाहाटीला गेलेले आणि मुंबईत राहिलेले आमदार, असे विभाजन न होता, हे सर्व एकत्र राहून भाजपसोबत पुन्हा शिवसेनेची युती होते का? यासंदर्भात चर्चा झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या