37.8 C
Latur
Monday, May 29, 2023
Homeउद्योगजगतचर्चा सुरु : मायक्रोसोफ्ट, मुबाडला जिओमध्ये गुंतवणूक करणार

चर्चा सुरु : मायक्रोसोफ्ट, मुबाडला जिओमध्ये गुंतवणूक करणार

एकमत ऑनलाईन

मुंबई- करोना संकटाचा अचूक वापर करून घेण्यात यश मिळविलेल्या रिलायंसचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या जिओ मध्ये पाच आठवड्यात पाच गुंतवणूकदरांनी गुंतवणूक केली आहेच पण आता गेट्स यांची मायक्रोसॉफ्ट आणि अबुधाबी मधील गुंतवणूक फर्म मुबाडला जिओ मध्ये गुंतवणूक करत असल्याचे समजते. या दोन्ही कंपन्यांची त्या संदर्भात जिओ बरोबर चर्चा सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मायक्रोसॉफ्ट जिओ डिजिटल पेमेंट सेवेमध्ये २ अब्ज डॉलर्स म्हणजे १५ हजार कोटी गुंतवणूक करून २.५ टक्के हिस्सा मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. फेब्रुवारी मध्ये सीईओ सत्या नादेला यांनी रिलायंस जिओ बरोबर भागीदारीचे संकेत दिले होते. जिओ मायक्रोसॉफ्टच्या अॅझ्यूअर क्लाउड सर्विसच्या सहाय्याने देशभर डेटा सेंटर स्थापण्याची योजना आखत आहे.

Read More  मी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाहीत : डोनाल्ड ट्रम्प

अबुधाबीची मुबाडला ही गुंतवणूकदार कंपनी रिलायंसचा डिजिटल विभाग जिओ मध्ये १ अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याच्या विचारात असून त्यासंदर्भात चर्चा सुरु आहेत. एप्रिल मध्ये फेसबुकने जिओ मध्ये ५.७ अब्ज डॉलर्स म्हणजे ४४ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. सिल्व्हर लेकने ७५० दशलक्ष डॉलर्स, विस्टा इक्विटीने १.५ अब्ज डॉलर्स, जनरल अटलांटिकने ८७० दशलक्ष डॉलर्स तर केकेआरने ११३६७ कोटी अशी एकूण ७८ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या