22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रवातावरणीय बदलांमुळे आजार बळावले

वातावरणीय बदलांमुळे आजार बळावले

एकमत ऑनलाईन

पुणे : वातावरणात होणा-या बदलांमुळे पुण्यात साथीचे आजार वाढले आहेत. कडक ऊन, मध्येच ढगाळ स्थिती, हलकासा पाऊस असे वातावरणात सतत बदल होत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखी या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत.

मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही घशात खवखव होणे, कान, नाकाच्या आजारांसह सर्दी, खोकला आणि तापासारख्या साथीच्या आजारांनी ग्रासले आहे. सरकारी दवाखान्यांबरोबरच छोट्या खासगी दवाखान्यांत येणा-या रुग्णांच्या संख्येतही दुपटीने वाढ झाली आहे.विविध प्रकारच्या आजारांची लक्षणे दिसताच दुखणे अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे अवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

वातावरणीय बदल
सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. कधी भरपूर पाऊस तर कधी भरपूर ऊन अशी सध्याची स्थिती आहे. या होणा-या बदलांमुळे पुण्यातील भोर तालुक्यात साथीचे आजार वाढले आहेत. कडक ऊन, मध्येच ढगाळ स्थिती, हलकासा पाऊस असे वातावरणात सतत बदल होत आहेत. त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर दिसून येतो आहे.

काही दिवसांपासून सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखी या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेतत. मोठ्याप्रमाणेच लहान मुलांनाही घशात खवखव होणे, कान, नाकाच्या आजारांसह सर्दी, खोकला आणि तापासारख्या साथीच्या आजारांनी ग्रासले आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या