16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमनोरंजन‘तारक मेहता’फेम दिशा वकानीला गळ्याचा कॅन्सर

‘तारक मेहता’फेम दिशा वकानीला गळ्याचा कॅन्सर

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेची दयाबेन ही व्यक्तिरेखा साकारणा-या दिशा वकानी संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. आणि ती बातमी दिशा वकानीच्या चाहत्यांसाठी वाईट आहे. काही रिपोर्टस्नुसार दावा केला जात आहे की दिशाला गळ्याचा कॅन्सर झाला आहे.

सध्या ती या आजाराशी झुंज देत आहे. बोलले जात आहे की गळ्याचा कॅन्सर तिला तिच्या दयाबेन या व्यक्तिरेखेमुळे झाला आहे, दिशा तारक मेहता मालिकेत एकदम वेगळ्याच आवाजात बोलायची. तो विशिष्ट आवाज ती त्या व्यक्तिरेखेसाठी काढायची . दिशा या आजाराशी कधीपासून लढतेय हे मात्र अद्याप कळलेले नाही

दिशा वकानीने २०१९ मध्येच मालिकेला रामराम ठोकला होता. यामागचे कारण तिने मॅटर्निटी लीव्ह असं सांगितलं गेलं होतं. त्यानंतर तिचे चाहते तिने शो मध्ये परत यावे याची मोठ्या आतुरतेने वाट पहात होते. मेकर्सनी शोमध्ये परत येण्यासाठी दिशाला अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण दिशाने प्रत्येक वेळी आपला नकारच कळवला. दिशाची दयाबेन ही व्यक्तिरेखा शोमध्ये महत्त्वाची होतीच पण प्रेक्षकांची फेव्हरेट होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या