21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रविधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेसमध्ये नाराजी

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेसमध्ये नाराजी

एकमत ऑनलाईन

चर्चा न करता परस्पर निर्णय : अशोक चव्हाण
मुंबई : एकीकडे भाजपा आणि शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर मंत्रिपदासाठी इच्छुक असणा-या अनेकांमध्ये नाराजी आहे.

दुसरीकडे विरोधी पक्षातील महाविकासआघाडीतही नाराजीनाट्य सुरू आहे. त्यांच्यातील नाराजीचा मुद्दा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद हा आहे. विधान परिषदेतील सभागृह नेतेपद शिवसेनेला देण्याचा निर्णय झाल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. यावर काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते बुधवारी (१० ऑगस्ट) माध्यमांशी बोलत होते.

अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘काँग्रेस पक्षाला विधान परिषदेत सभागृह नेतेपदाचे, विरोधी पक्षनेतेपदाचे स्थान मिळालयला हवे होते. मात्र, चर्चा न होताच परस्पर हा निर्णय झाला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे काँग्रेसमध्ये याची प्रतिक्रिया आहे.’’ संजय राठोडांना मंत्रीमंडळात घेण्यावरूनही चव्हांना प्रश्न विचारण्यात आला.

मंत्रीमंडळात कुणाला घ्यायचे आणि कुणाला घ्यायचे नाही हा सर्वस्व निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. हे दोन पक्षाचे सरकार असल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच यावर अधिक स्पष्टीकरण देऊ शकतील. असे अशोक चव्हाण म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या