24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीयतुरुंगात कैद्यांमध्ये वाद, चमच्याने केला खून

तुरुंगात कैद्यांमध्ये वाद, चमच्याने केला खून

एकमत ऑनलाईन

चंदिगढ : तुरुंगामध्ये रात्री झोपण्यासाठी अंथरूण कुणी घालायचे, यावरून सुरू झालेल्या भांडणाचा परिणाम खुनात झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. कैद्यांच्या रात्रीच्या जेवणानंतर अंथरुण घालण्यावरून त्यांच्यात वाद सुरु झाला. बघता बघता या वादाने हाणामारीचे स्वरूप घेतले आणि प्रकरण खुनापर्यंत पोहोचले. पंजाबमधील चंदिगढच्या भवानीनगर रोडवर असणा-या तुरुंगात दोन कैद्यांचे अंथरूण घालण्याच्या मुद्द्यावरून भांडण पेटले होते. सुखजिंदर सिंग उर्फ सुखा आणि सोनू यांच्यात कडाक्याचे भांडण सुरु झाले होते. ते भांडण सोडवण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या तुरुंगातील कर्मचा-यांनी प्रयत्न केले. दोघांनाही शांत करण्यात आले आणि वाद थांबवायला सांगण्यात आले. हा वाद मिटला असे वाटत असतानाच अचानक सोनूने सुखावर हल्ला केला. आपल्या हातातील टोकदार चमच्याने त्याने सुखाच्या छातीवर वार केले.

यातील काही वार सुखाच्या हृदयापर्यंत पोहोचल्यामुळेत तो जागीच खाली कोसळला. हॉस्पिटलमध्ये मृत घोषित या घटनेनंतर तुरुंग प्रशासनातील अधिका-यांनी तातडीने सुखाला हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले. अंथरुण घालण्याच्या किरकोळ कारणावरून कैद्यांमध्ये झालेल्या मारामारीची जोरदार चर्चा सध्या पंजाबमध्ये सुरू आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या