मुंबई : राज्यात पुन्हा सत्तापरिवर्तन होऊ शकते. पुन्हा सत्तापरिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको असे मोठे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौ-यावरूनही संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले.
सुप्रीम कोर्टात संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची खात्री असल्याने १६ आमदार अपात्र ठरतील असा विश्वासही संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
सुप्रीम कोर्टात संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची खात्री असल्याने १६ आमदार अपात्र ठरतील हे नक्की आहे. बचाव करण्यासाठी या आमदारांना दुस-या पक्षात विलीन व्हावे लागेल, पण यानंतर ते आपल्याला शिवसैनिक म्हणू शकणार नाहीत. दुस-या पक्षात विलीन होण्यास किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची आम्हाला कल्पना आहे. आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा संजय राऊतांनी यावेळी केला.
पुन्हा सत्तापरिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असे मोठे वक्तव्यही राऊत यांनी यावेळी केले आहे.
शिवसेनेचे हायकमांड कायम मुंबईत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौ-यावरूनही संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना कधी दिल्लीला यावे लागले नाही. शिवसेनेचे हायकमांड कायम मुंबईत राहिले आणि आता मुंबईतच चर्चा होत नाही. दिल्लीतील लोक मुंबईत येऊन शिवसेनेशी चर्चा करत होते. युती करण्यासंदर्भात अमित शहादेखील ‘मातोश्री’वर आले होते.
संजय राऊत स्वप्नं पाहतात : मुख्यमंत्री शिंदे
राज्यात लवकरच सत्तांतर होईल असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते, त्यानंतर संजय राऊत स्वप्नं पाहतात. त्यांना स्वप्नात राहू द्या, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावला आहे.