22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रबाळासाहेबांना खुजे करू नका

बाळासाहेबांना खुजे करू नका

एकमत ऑनलाईन

  आमदार संजय शिरसाठांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुंबई : एका दर्जावर गेलेल्या मोठ्या नेत्याला खाली खेचू नका. बाळासाहेबांनी कधी शिवाजी महाराजांना नमस्कार केल्याशिवाय सभा सुरू केली नाही. शिवसेनाप्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही. हे प्रत्येक शिवसैनिकाचे दैवत आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, बाळासाहेबांना खुजे करू नका, असे म्हणत शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले.

शिंदे गटाने बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. या सगळ्या भूकंपानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून आपल्या रोखठोक बाजू मांडली. या मुलाखतीमुळे शिंदे गटामध्ये खळबळ उडाली आहे. आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट उद्धव ठाकरेंनाच उत्तर दिले.

आम्ही कसे श्रेष्ठ हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. वाईट वाटलं पालापाचोळा म्हटल्यावर. काम संपलं म्हणून उचलून कच-यात टाकलं असं म्हणणं किती योग्य? या गळालेल्या पालापाचोळ्याचं खतही तयार होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हे आमच्यासाठी खूप मोठे आहेत. त्यांच्या पुण्याईमुळे आम्ही आमदार, खासदार झालो आहोत. तुम्हाला राजकारण करायचे आहे तर बाळासाहेबांचा वापर कशाला करता.

एका दर्जावर गेलेल्या मोठ्या नेत्याला खाली खेचू नका. बाळासाहेबांनी कधी शिवाजी महाराजांना नमस्कार केल्याशिवाय सभा सुरू केली नाही. शिवसेनाप्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही. हे प्रत्येक शिवसैनिकाचे दैवत आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, बाळासाहेबांना खुजे करू नका, असे शिरसाट म्हणाले.
जी पानं गळाली आहेत, त्यांचा अपमान करू नका. मनोहर जोशी तुमच्याजवळ कधी दिसले नाहीत.

ढाके कधी दिसत नाहीत. काळ बदलत जातो, नवीन माणसं आली आहेत, ती स्वीकारा, पालापाचोळा कसं म्हणू शकता. ढाके, मनोहर जोशी, शरद आसारे कधी शिवसेनेचे पान नव्हते का? शिवसेनेच्या नेत्यांनी खेड्यापाड्यांत जाऊन काम केले आहे. आम्ही या पक्षात आयुष्य घालवले आहे. ३८ वर्षे या पक्षात घालवली आहेत, आम्हाला पालापाचोळा म्हणताय, उद्या तुम्हाला कुणी म्हटलं तर काय होईल, असा संतप्त सवाल शिरसाटांनी केला.

उद्धव ठाकरे आजारी असताना बंडाची हालचाल सुरू होती, याबद्दल जे बोलले ते चुकीचे आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना त्यावेळी बैठका झाल्या नाहीत. वर्षभरापासून हे सुरू होते. उद्धव ठाकरे आजारी होते, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी यज्ञ केले होते, असेही शिरसाट म्हणाले.

आम्ही कोणत्या पक्षात जाणार आहोत, याबद्दल चिंता करू नका, आम्ही आमचं काय ते पाहू ना. दर वेळा कुणाचे बहुमत घेऊन आपण सत्तेत आलो आहोत हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे आम्ही सपा, एमआयएममध्ये जाणार याचा विचार करू नका, आम्हाला कुठे जायचे तिथे आम्ही जाणार आहोत, असे उत्तरही शिरसाट यांनी दिले.

संजय राऊत यांनी खोडा घातला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सख्य कधी पाहिलं नाही. संजय राऊतसारखा माणूस गेला आणि त्याने जुळवाजुळव केली, त्यामुळे आज ही अवस्था झाली. त्यामुळे आम्ही सगळे बाहेर पडलो. उद्धव ठाकरेंना कसा राग येईल, शरद पवार कसे जवळ येतील, हे असं घडवून आणलं आहे, अशी टीका शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेसुद्धा होऊ शकत नाहीत. आम्हाला शिवसेनाप्रमुख व्हायचं नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. शिवसेनाप्रमुख हे शिवसेनाप्रमुख आहेत. त्यांच्या पायाजवळ राहू, आम्हाला शिवसेनाप्रमुख व्हायची गरज नाही. आमची लायकी नाही. आम्ही त्यांची बरोबर करू शकत नाही, आज त्यांचा आशीर्वाद जरी घेतला तरी खूप झालं. एक वेळ तुम्हाला विसरू पण शिवसेनाप्रमुखांना विसरू शकत नाही, असे शिरसाट म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या