22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रहे राणे स्वत:ला समजतात काय? निलेश राणेंवर भडकल्या अंजली दमानिया

हे राणे स्वत:ला समजतात काय? निलेश राणेंवर भडकल्या अंजली दमानिया

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी नुकतेच मालवण नगर परिषदेवर धडक मोर्चा काढत मुख्य कार्यकारी अधिकारी जिर्गे यांना धारेवर धरले होते. आता सत्ता बदलली आहे, गाठ माझ्याशी आहे असा दमही निलेश राणे यांनी सर्वांसमोर दिला होता.

निलेश राणेंच्या या वर्तणुकीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. हे राणे कुटुंबीय स्वत:ला काय समजतात? अशी विचारणा केली आहे.

‘‘नितेश राणे, निलेश राणे आणि नारायण राणे यांची भाषा आणि वागण्याची पद्धत यावर वारंवार चर्चा होत असते. निलेश राणे कोणत्या हक्काने तिथे गेले होते? सध्या हे सामान्य नागरिक असून त्याप्रमाणेच वागले पाहिजे. प्रत्येक अधिका-याला मान-सन्मान दिलाच पाहिजे.

आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो, पण त्याची एक पद्धत असते. आम्हीदेखील अनेक अधिका-यांना प्रश्न विचारतो. पण कुठे बसतो, बोलतो याचे भान ठेवायला हवे,’’ असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

‘‘ही काय भाषा आहे? हे स्वत:ला काय समजतात? सरकारी अधिका-याच्या कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांच्याविरोधात लगेच गुन्हा दाखल झाला पाहिजे,’’ अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. तिघांनाही शिस्त लावली पाहिजे असेही त्या म्हणाल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या