23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रवेदांता-फॉक्सकॉनसाठी वाट्टेल ते करा ; अजित पवारांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

वेदांता-फॉक्सकॉनसाठी वाट्टेल ते करा ; अजित पवारांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

एकमत ऑनलाईन

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. या सर्वामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.

यामध्ये त्यांनी हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात यावेत अशी विनंती केली आहे. महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा हा प्रयत्न असून, महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप पत्रात करण्यात आला आहे.

पत्रात नेमकं काय?
महोदय,
वेदांता ग्रुपचा सेमीकंडक्टर व डीस्प्ले फॅब्रिकेशनचा तळेगाव येथे येणारा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरात येथे नेल्याचे कळते. वेदांता व तैवान येथील फॉक्सकॉन या कंपनीचे ६०:४० असे जॉईन्ट व्हेंचर झाले आहे. सर्वसाधारणपणे २ लाख कोटींची गुंतवणूक व अंदाजे १.५ लाख रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प उभारणीसाठी या कंपनीने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यांबरोबर चर्चा केली.

जागा निवडीसाठी एकूण १०० मुद्यांचा विचार करून त्यांनी तळेगाव टप्पा ४ ही जागा अंतिम केली. त्यासाठी तळेगाव येथील त्यांना आवश्यक असणारे इकोसिस्टिम, अ‍ॅटोमोबाईल व इलेक्ट्रिक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टिव्हिटी, जेएनपीटीशी असणारी कनेक्टिव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्याने त्यांनी तळेगाव येथील १००० एकर जागेची निवड केली होती.

वेदांताच्या वरिष्ठ टीमने सर्व बाबींचा विचार करून तळेगाव हेच ठिकाण योग्य असल्याचे सुचविले आहे. उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने त्यांना ब-याच सवलती देण्याचे मान्य केल्याचे कळते. मात्र वरिष्ठ राजकीय दबावापोटी ही गुंतवणूक गुजरात येथे गेल्याचे कळते. हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित आहे. या ठिकाणी तळेगावच्या तुलनेत काहीच नाही.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या