21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeक्राइमदिल्लीतील AIIMS हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारून डॉक्टरची आत्महत्या

दिल्लीतील AIIMS हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारून डॉक्टरची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीतील एम्स हॉस्टेलमध्ये एका मेडिकलच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एम्स हॉस्टेलच्या रुम नं. १९ छतावरून या विद्यार्थ्यांने उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

विकास या २२ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. विकास हा बंगळुरू येथे राहणारा होता. सोमवारी सायंकाळी ६ वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली असून एम्समध्ये एका विद्यार्थ्याने टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये तातडीने नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पाच वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी केल्यासही ग्रॅच्युईटी?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या