27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeसोलापूरडॉक्टरांनी हलगर्जीपणा करू नये ; विखे पाटलांच्या सूचना

डॉक्टरांनी हलगर्जीपणा करू नये ; विखे पाटलांच्या सूचना

एकमत ऑनलाईन

लम्पी रोगामुळे राज्यात २ हजार १०० जनावरांचा मृत्यू
सोलापूर : लम्पी स्कीनबाबत डॉक्टरांनी हलगर्जीपणा करू नये. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या आहेत. राज्यात लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढत आहे. त्यामुळे राज्यातील पशुपालक चिंतेत आहेत. लम्पी स्कीनमुळे आतापर्यंत राज्यात २ हजार १०० जनावरांचा मृत्यू झाला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी डॉक्टरांना काही सूचना केल्या आहेत. डॉक्टरांनी हलगर्जीपणा करू नये. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना विखे-पाटील यांनी दिल्या आहेत.

राज्यात गायवर्गीय जनावरांना लम्पी आजार होऊन त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर टास्क फोर्सच्या अधिका-यांनी संशोधन करून मृत्यू होण्याची नेमकी कारणे शोधून उपाययोजना काय कराव्यात, हे सुचवावे असे विखे-पाटील म्हणाले. पशुधन मालकांची पशु ही संपत्ती आहे. जनावरांचा मृत्यू होऊ देऊ नका. बरी झालेली जनावरे लम्पी आजार न झालेल्या जनावरांमध्ये मिसळणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी असेही विखे-पाटील यावेळी म्हणाले.

टास्क फोर्सने राज्यातील सर्व जिल्हानिहाय पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांची ऑनलाईन कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करावे. जनावरांची कोणती तपासणी करावी, निदान काय येईल, यावर कोणते उपचार करावेत, याविषयी कार्यशाळेत योग्य मार्गदर्शन करावे. पशुवैद्यकीय अधिका-यांनी प्रत्येक गावनिहाय नकाशे करावेत. जनावरांचे पर्यवेक्षण करून उपचार करावेत. यामध्ये स्थानिक डॉक्टरांनी हलगर्जीपणा करू नये, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.

राज्यामध्ये आतापर्यंत लम्पी आजाराने २ हजार १०० जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होऊ नये. लागण झाली तर मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना विखे पाटील यांनी दिल्या आहेत. सोलापूर तेथील नियोजन भवन येथे लम्पी आजाराबाबत राज्य टास्क फोर्सच्या बैठकीत विखे पाटील बोलत होते.

यावेळी आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते-पाटील, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. बिकाणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

एक कोटी ८ लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण
राज्यात एक कोटी ४० लाख जनावरे असून एक कोटी १५ लाख लस मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. सर्वांना वेगाने लसीकरण सुरू असून एक कोटी ८ लाख जनावरांचे लसीकरण झाले आहे. सध्या ५२ हजार पशु बाधित असून २ हजार १०० जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकाही म्हशीचा समावेश नसल्याने म्हशींची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली. वेळेत निर्णय आणि गतीने लसीकरण सुरू केल्याने दोन हजार गावांत लम्पी कमी होतोय. अत्यवस्थ जनावरे कमी होत आहेत, सध्या किरकोळ आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या