मुंबई: वृत्तसंस्था
गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे देशातील सर्व व्यवहार ठप्प आहे. रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक सक्तीने बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले होते. यामुळे विमान कंपन्यांना देखील सेवा देता येत नव्हती. आता २५ मेपासून पुन्हा विमान कंपन्यांनी बुकिंग सुरू केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २५ मेपासून हवाई वाहतूक सुरू होणार आहे.
कोरोना व्हायरसमुळे ३१ मेपर्यंत विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला तेव्हापासून विमान सेवा बंद आहे. सोमवारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशांतर्गत विमान सेवा २५ मेपासून सुरु केली जाईल. यासाठीचे बुकिंग देखील सुरू करण्यात आले आहे. स्पाइस जेटच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांची आंतरराष्ट्रीय सेवा १५ जूनपर्यंत बंदच राहील.
देशांतर्गत सेवेसाठी इंडिगो आणि विस्तारा यांनी बुकिंग सुरू केले आहे. यासंदर्भात स्पाइस जेटने मात्र १५ जूनपर्यंत सेवा बंद राहील असे सांगितले. बुकिंग सुरू करण्याबाबत इंडिगो, विस्तारा आणि गोएअर यांनी अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एअर पॅसेंजर असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष सुधाकर रेड्डी यांनी सोमवारी सांगितले की, काही विमान कंपन्यांनी बुकिंग सुरू केले आहे.
Read More 8 राज्यांमध्ये हाय अलर्ट : पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरून पुढे सरकरणारं ‘अंम्फन चक्रीवादळ’
२५ मेपासून विमान सेवा सुरू होईल़ या शक्यतेने इंडिगो, स्पाइसजेट आणि गोएअर यांनी आंतरराष्ट्रीय बुकिंग सुरू केले आहे. देशातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवल्यानंतर डीजीसीएने तातडीने सर्व विमान सेवा ३१ तारखेपर्यंत बंद असतील असे जाहीर केले होते.