27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयघरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागले

घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झालेले असताना इंधन, गॅस सिलिंडरमध्ये दरवाढ सुरुच आहे. आज एलपीजी गॅसच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ३.५० रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ८ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यासोबतच देशात एलपीजी सिलिंडरची किंमत १००५ रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य आधीच होरपळत असताना या दरवाढीमुळे त्यांच्यासमोरील अडचणीत आणखी वाढ होणार आहे.

व्यावसायिकांसमोरील अडचणीतही वाढ
व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ८ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत १९ किलो वजनाचा व्यावसायिक सिलिंडरसाठी आता २३५४ रुपये मोजावे लागणार आहे. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईसाठी नवीन दर अनुक्रमे २४५४ रुपये, २३०६ रुपये आणि २५०७ रुपये आहेत. हातगाडी, ठेला, लहान हॉटेल, अशा किरकोळ व्यावसायिकांना या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या