Sunday, September 24, 2023

डॉनला कोरोनाने पकडलंय, घरात थांबा, उगाच डॉन बनू नका

घराबाहेर पडणाऱ्या अतिशाहण्यांना नगरपालिकेने एका अनोख्या पोस्टरमधून घरातच थांबण्याचा सल्ला : आपणही आपल्या परिवारासाठी घरीच थांबा. उगाच डॉन बनू नका.

उस्मानाबाद : जनजागृतीसाठी काही नगरपालिकांनी भन्नाट कल्पना राबवून लोकांपर्यंत संदेश दिला आहे. असंच एक उदाहरण उस्मानाबादमध्ये पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक सरकारी यंत्रणा कोरोना नियंत्रण आणि जनजागृतीवर मोठा भर देताना दिसत आहेत. कोरोना संसर्गाची पर्वा न करता घराबाहेर पडणाऱ्या अतिशाहण्यांना नगरपालिकेने एका अनोख्या पोस्टरमधून घरातच थांबण्याचा सल्ला दिला आहे यासाठी थेट बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांनाही कोरोना झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

उस्मानाबादमधील लोहारा नगरपालिकेने अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध चित्रपट ‘डॉन’चा लोकप्रिय डायलॉग वापरुन हे पोस्टर तयार केलं आहे. या पोस्टरवर लिहिलं आहे, ‘ज्या डॉनला पकडणे मुश्कीलच नाही तर नामुमकीन होते, त्याच डॉनला कोरोनानं पकडलंय. आपणही आपल्या परिवारासाठी घरीच थांबा. उगाच डॉन बनू नका.’ या पोस्टरवर अमिताभ बच्चन यांच्या डॉन चित्रपटाचं बॅनरही लावलं आहे. सोबतच कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी याच्या सूचनाही लिहिण्यात आल्या आहेत

Read More  कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउन वाढवू नका; आयुक्तांकडे मागणी

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या