वॉशिंग्टन : यूट्यूब चॅनलवरून गायब झाल्यानंतर दोन वर्षांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा यूट्यूबवर परतले आहेत. २०२० मध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटल बिंिल्डगवर हल्ला केला, त्यानंतर त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स गोठवण्यात आले. त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या समर्थकांना हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप होता.
त्यानी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर आणि त्याच्या फेसबुक पेजवर ११ सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये त्याने लिहिले, मी परत आलो आहे ! हा व्हिडीओ त्यांच्या एका निवडणूक रॅलीचा आहे ज्यात ते म्हणत आहेत, माफ करा तुम्हाला वाट पाहण्यासाठी, हे गुंतागुंतीचे प्रकरण आहे.
ते पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे, हे पाहता त्यांना पुन्हा सोशल मीडियावर दिसण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती आहे.